recent posts

Comments system

[blogger][disqus][facebook]

18 April 2020

एक होता "आईनस्टाइन"! One was Einstein


एक होता "आईनस्टाइन" ! (One was Einstein)

असं होतं ना बऱ्याचवेळा, की प्रत्येकवेळी आपल्याला कोणाला प्रत्यक्षात भेटण्याची गरज नसते. कोणी पुस्तकातून, लिखाणातून, चित्रांतून... किंवा इतर कुठल्या माध्यमांतून आपल्याला भेटत असतो आणि आपल्याला तो जवळचा वाटत राहतो. 

कुठलाही वैज्ञानिक हा ग्रेट असतोच, पण 'आईन्स्टाईन' मला सगळ्यांच्यात थोडा जास्तच ग्रेट आणि फार जवळचा, अगदी घरातला वाटतो. ते तसं वाटण्यामागे असंख्य कारणं असतील. त्याची साधी राहणी, उच्च विचार कारणीभूत आहेत, की मग त्याची हुशारी, माहित नाही. पण आपल्या सामान्य माणसांसारखंच त्यानेही असंख्य समस्या झेलल्या, रोजचं जगण्यातलं डिप्रेशन त्यालाही कित्येकवेळा खचवत गेलं की त्याच्याही मनात आत्महत्येचे विचार बळावू लागावेत... आणि तरी देखील तो त्यासगळ्याशी झटून विज्ञानासाठी पुरून उरला. 

लहान मुलांना शिक्षण देताना ते गोष्टीच्या स्वरूपात असावं, ते छान रंगवून सांगावं, काल्पनिक जग त्यांच्यासमोर उभं करावं. त्याने त्यांच्या भावविश्वात होणारी खळबळ, त्यांना पडणारे प्रश्न-कुतूहल ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी फार महत्त्वाच्या असतात. 

आईन्स्टाईनच्या लहानपणी त्याच्या हातात आलेल्या कंपासाने त्याच्या डोक्यात प्रश्नांची रांग सुरु केली. 'एक अदृश्य शक्ती कसं काय हे कंपासातली सुई हलवू शकते, कुठली शक्ती आहे ती, ती पाहायला मिळेल का'....  त्या ५ वर्षाच्या मुलाला हे प्रश्न पडू लागले. १२ व्या वर्षी हातात आलेल्या विज्ञानाच्या मजेदार पुस्तकांनी (Popular Books on Physical Science), त्याची कल्पनाशक्ती चाळवत गेली. 'आपण एका इलेकट्रीकल वायरमध्ये बसून अगदी विजेच्या बाजूने जातोय, ती पाहतोय', ह्या त्या पुस्तकातल्या कल्पनेने, त्यालाही 'प्रकाशकिरण-प्रकाशझोत कसा असेल', 'आपण ते पाहता येईल का'.... या सारख्या गोष्टी डोक्यात येऊ लागल्या. 

प्रश्न-चिकित्सा हे सगळं प्रगतीसाठी गरजेचे असतात. जर 'प्रश्न विचारण्याचीच' भीती निर्माण केली गेली, किंवा उत्तरं देण्याचं टाळत राहिलो, तर तो "विकासासाठी अडथळा" होऊ शकतो. 

आईन्स्टाईनकडून शिकण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत. शाळेत गेलं, उच्च मार्कांनी पास झालं म्हणजे खूप प्रगती करालच असं काही नसतं. तुमचा विकास हा सर्वस्वी तुमच्या पॅशनवर असतो. आणि त्या पॅशनचा आणि आपल्या उच्च मार्कांचा संबंध नसतो. ना तो तुमच्या वयाशी असतो, ना परिस्थितीशी.  

नोकरीसाठी स्ट्रगल करणारा आईन्स्टाईन, घरच्या परिस्थितीमुळे डिप्रेशनमध्ये जाणारा आईन्स्टाईन, संसाराच्या किचकट गोष्टींमध्ये अडकणारा आईन्स्टाईन.... आणि हे सगळं चालू असताना आपल्या डोक्यातले प्रश्न, त्यावरचे अंदाज, ते सिद्ध करून जगाला एक नवीन दिशा देणारा आईन्स्टाईन. 
----------------

आईन्स्टाईनने १९०५ मध्ये सहा प्रबंध लिहिले, त्या वर्षाला आईन्स्टाईनचं 'चमत्कारिक वर्ष' म्हटलं जातं (annus mirabilis). त्यातले ३ प्रबंध हे फिजिक्सच्या दुनियेला 'उथल-पुथल' करणारे होते. आणि त्याचा फायदा भौतिकशास्त्राशी जोडलेल्या प्रत्येक क्षेत्राला होणार होता. आणि हे सगळं तो फावल्या वेळात, आपला नोकरी-धंदा करून करायचा. ब्राऊनियन मोशनमधून त्याने कणामधील रेणूंच्या टक्करा दाखवून, 'अनु-रेणू' विश्व समजायला सोपं केलं. स्पेशल थिअरीबद्दल किती बोलावं आणि किती नाही... त्यानंतरची 'जनरल थिअरी' हा शोध म्हणजे, बाकी शोध एकवेळ ठीक, पण आईन्स्टाईनशिवाय ही थिअरी कुणीही मांडू शकला नसता, असं त्याकाळी म्हटलं जाऊ लागलं. रातोरात स्टार झाला तो.  

त्याला मिळालेलं नोबेल हे, 'फोटो-इलेकट्रीक इफेक्ट साठी होतं. कारण स्पेशल थिअरीबद्दल (थिअरी ऑफ रॅलेटिव्हिटी), एकमत होत नव्हतं. 
'फोटो-इलेकट्रीक इफेक्ट' हे त्याचं सर्वात महत्त्वाचं काम होतंच, पण जनरल थिअरीची गोष्टच निराळी होती. साक्षात न्यूटनला शह द्यायचा होता, त्याच्या सिद्धांतांना तडा लागणार होता. 

फोटोइलेक्ट्रिक इफेक्टनेदेखील बऱ्याच गोष्टी बदलणार होत्या. त्यातली सर्वात मोठी गोष्ट होती ती, आईन्स्टाईनचं प्रकाशाला कण मानणं. आतापर्यंत प्रकाश ही लहर (Wave) आहे असं सिद्ध करण्यात आलं होतं. आणि आईन्स्टाईनने 'फोटॉन्स' ह्या कणांनी प्रकाशकिरण बनलेला असतो, हे सांगितलं. क्लासिक विज्ञानात हे बसणारं नव्हतंच. मॅक्सवेलने इलेकट्रोमॅग्नेटीक लहरीसारखंच प्रकाश ही लहर आहे म्हटलं, पण त्या लहरींचं माध्यम काय ? जसं आवाजासाठी हवा हे माध्यम, तसं प्रकाशकिरण हे जर लहर असेल, तर मग ते माध्यम कुठलं कळेना झालं. आणि त्यावर तोडगा म्हणून वातावरणात 'ईथर' असं अदृश्य-काल्पनिक काही पसरलेलं आहे, असं ठरवण्यात आलं. अर्थात आईन्स्टाईनने सगळं निकालात काढलं. ईथर शोधण्याचा कित्येक वर्ष प्रयत्न झाला, पण ते काही सापडलं नाही. 

असं नव्हतं की आधी कोणीच 'टाइम मशीन' वगैरेचा विचार केला नव्हता. आधीही चौथं डायमेन्शनची कल्पना केली होतीच. पण सर्वांनी चौथं डायमेन्शन स्पेसच्या कल्पने पलीकडे केलं नाही. आणि आईन्स्टाईनने चौथ्या डायमेन्शनची सांगड घातली वेळेशी.  

स्पेशल थियरी, म्हणजे सापेक्षतावाद लिहिताना त्याने काय नक्की खाल्लं होतं कुणास ठाऊक. कारण ती संकल्पनाच पूर्ण वेगळी होती. आधीच्या क्लासिकल विज्ञानाप्रमाणे, फ्रेम ऑफ रेफरन्सचा विचार केला गेला, तर अंतर, वेळ हे सगळं सारखंच राहणार होतं. कोणीही, कुठूनही, कधीही मोजा - अंतर,वेळ सारखंच. पर आईन्स्टाईन तो आईन्स्टाईन है भाई. तो 'वेळ आणि अंतर' हे दोन्ही सापेक्ष ठरवून मोकळा झाला. आणि हे कोणालाही झेपण्यासारखं नव्हतं. कारण ते कसं शक्य होईल ?  मुंबईत बसलेली व्यक्ती आणि पुण्यात बसलेली व्यक्ती, दोघांमधलं अंतर एकच असणार आहे, आणि वेळ देखील एकच, आणि जरी त्यातली एखादी व्यक्ती फिरत्या बसमध्ये असली, तरी वेळ थोडीच बदलणार आहे ? ती देखील सारखीच असणार, मग हा काय बोलतोय वेगळं असणार ?  

आईन्स्टाईनच्या मताप्रमाणे आपण प्रत्येकजण आपलं स्वतःचं घड्याळ घेऊन फिरतो. आणि ते घड्याळ प्रकाशाच्या वेगावर अवलंबून असणार. रोजच्या दैनंदिन जीवनात, अगदी आपण ५०० किमीप्रतीतास जरी गेलो तरी आपण कधीही प्रकाशाच्या वेगाच्या किंचितही जवळ जात नाही. आणि ह्यासाठी त्याने "L = L0((1 - v2/c2))1/2", हे समीकरण मांडलं. ज्यात C हा प्रकाशाचा वेग, जो ३ लाख मीटरप्रती सेकंद असतो, आणि त्याचाही वर्ग.... त्यामुळे आपल्या दैनंदिन गतीने आपल्याला वेळ सापेक्ष वाटणार नाही. 

पण या समीकरणाने, जर आपण प्रकाशाच्या वेगाने जाऊ लागलो (जे आज शक्य नाही), तर स्थिर असणाऱ्या माणसाच्या घड्याळात आणि आपल्या घड्याळात अंतर जाणवेल. आपलं घड्याळ चक्क थांबलेलं असेल. आणि त्याहून वेगात गेलो, तर मग 'टाईम मशीन', म्हणजेच आपण भूतकाळात जाऊ शकू. 
अर्थात हे सगळंच एकंदर झेपण्यासारखं नव्हतं. कारण एकतर येवढ्या गतीचा विचार करणं शक्य नव्हतं. आणि दुसरं 'ट्विन पॅराडॉक्स'. 
यावर Interstellar नावाचा खूप सुंदर चित्रपट येऊन गेला. ज्यात बाप ब्लॅकहोलमध्ये अडकतो, आणि जेव्हा तो परत येतो, तेव्हा त्याची लहान मुलगी ही त्याच्याहूनही दुपटीने मोठी झालेली असते, तर तो तरुणच असतो. अर्थात तो  चित्रपट देखील झेपला नाहीच कित्येकांना. (Inception देखील न झेपणारा)    

जसं आईन्स्टाईनने अंतर आणि वेळ, यातली गुंतागुंत बाजूला केली, तसं त्याने वस्तुमान ऊर्जा, या दोघांमधलं नातं शोधून दाखवलं. आणि ते करताना त्याने जगाला दिलं एक प्रसिद्ध समीकरण, "E = mc2". या समीकरणाने हळूहळू सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू लागली. खगोलशास्त्रासाठी ते फार मोलाचं ठरणार होतं.  

प्रकाशकिरण हा कणांनी बनलेला आहे, लहर नाही... हे सिद्ध करणं प्रचंड अवघड होतं. कारण न्यूटनच्या नियमाप्रमाणे गुरुत्वाकर्षणाने प्रकाशकिरण जे वाकतील, ते आईन्स्टाईनच्या 'वक्र स्पेस' च्या गणिताप्रमाणे, जास्त वाकणार होते. मग दुसरीकडून आलेले प्रकाशकिरण सूर्याजवळून जाताना किती वाकतात, हे पाहायचं ठरलं, पण कसं ? प्रकाशकिरण लक्ख प्रकाशात कसं मोजता येतील, पाहता येतील ? आणि त्यावर आईन्स्टाईनने 'सूर्यग्रहण' असताना ते मोजण्याचं सुचवलं. हा प्रयोग म्हणजे जगातला सर्वात मोठा प्रयोग होता. सर्व विज्ञानप्रेमी याकडे डोळा लावून बसलेले. न्यूटन, आईन्स्टाईन आणि साक्षात सूर्य.  
अर्थात आईन्स्टाईन खरा ठरला आणि न्यूटनचा सिद्धांत फोल ठरला. 

शंभर वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली जनरल थिअरी आणि त्यातली 'वक्र स्पेसची' संकल्पना, गुरुत्वाकर्षण हे दुसरं-तिसरं काही नसून, आपल्या सभोवतालची स्पेस वक्र असल्यामुळे घरंगळत खाली जाणे किंवा सभोवताली फिरणे होय.... हे फेब्रुवारी २०१६ ला सिद्ध झालं.

------------------------------------------

आईन्स्टाईनने कधी स्वतःला नास्तिकही म्हणून घेतलं नाही, ना त्याने कुठला देव-धर्म यावर विश्वास ठेवला. तो म्हणायचा, 
"आपण एक लहान मूल आहोत आणि आपल्यासमोर एक मोठी लायब्ररी आहे. त्यात असंख्य वेगवेगळ्या भाषेतली पुस्तकं आहेत. आणि मला माहित नाही हे काय आहे, पण मी एका लहान मुलासारखं उत्सुक आहे, ते "काय" शोधण्यासाठी" 

काही लोकं संसारासाठी बनेलेलीच नसतात. बायका-मुलं-बाळं त्यांना बंधिस्त करू शकत नाहीत. त्यांच्या डोक्यात असणाऱ्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतात. आणि त्याच्यासाठीच त्यांच्याकडे वेळ असतो. नुसतं अन्न-निवारा याची सोय करायची आणि अंडी टाकून ती वाढवत राहायची, आणि एक दिवस 'अलविदा'.. छे हे कसलं लाईफ. जनावरं काय वेगळं करतात. काहीतरी ठोस असायला हवं. मनातलं ध्येय पूर्ण करता यायला हवं. आयुष्याचं चीज व्हावं, असं काहीतरी. कदाचित आपल्या सामान्यांच्या बाबतीत, ते 'काहीतरी' काय, हे शोधण्यातच आयुष्य जातं.  

आईन्स्टाईनला खरंतर आपलं मरण पुढे ढकलता आलं असतं. पण त्याने सर्जरीसाठी नकार दिला. तो म्हणाला,

"मला या जगातून तेव्हा जायचंय, जेव्हा मला वाटेल. कृत्रिमपणे आयुष्य जगवत ठेवण्यात ती मजा नाही. मी माझ्या वाटचं काम केलेलं आहे. आता माझी जायची वेळ झाली. मी ते शांतपणे करेन"

आणि १८ एप्रिल १९५५ ला अल्बर्ट आईन्स्टाईनने स्वइच्छेने दिमाखात एग्झिट घेतली. 

---------------------------  

"प्रिय आईन्स्टाईन, 

तू मला कुठल्याही शक्तीशाली-धैर्यवान राजां-महाराजांहून, कुठल्याही महापुरुषांहून, इतिहासातल्या कुठल्याही ग्रेट पात्रांहून फार उच्च वाटतोस. तुझ्या जयंतीला-पुण्यतिथीला लोक रस्त्यावर येत नाहीत. तुला एकेरी बोललं म्हणून कधी तुझा अपमान झाला नाही. तुला शिव्या घातल्या, टिंगल उडवली म्हणून कुणी कुणावर धावून जात नाही. तू आमच्यासारख्या, ज्याचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे, अशा कुणासाठीही तू कधी अस्मितेचा प्रश्नही झाला नाहीस. आमच्या भावना तुझ्याबद्दलच्या सच्च्या आहेत आणि त्या मनापासून आहेत. त्याचा दिखावा करण्याची आम्हाला कधी गरज भासली नाही.  

'आईन्स्टाईन आज तू हवा होतास' , असं रडगाणं देखील आम्ही गाणार नाही. कारण हजार वर्ष जगला असतास तरी ते आम्हाला कमीच वाटलं असतं. पण तरी टाईम मशीन बनवून गेला असतास तर आलो असतो तुला भेटायला. तुझ्या कुरळ्या केसांतून हात फिरवताना, अंतराळात विखुरलेल्या असंख्य प्रकाशकिरणांच्या कणांमधून हात फिरवल्यासारखं वाटलं असतं. पण जे दिलंस तेही खूप, पुरून उरण्यासारखं. शंभर वर्षांनंतरही तुझ्या थिअरीज अजून कुणी खोडू शकला नाही. पण ते कुणीतरी खोडून काढावं आणि जे सिद्ध आहे ते पुढे स्वीकरावं, असं मनोमन वाटतं देखील. यालाच आपण प्रगती म्हणू ना ? 

काश, आम्ही तुझा ध्यास घेतला असता, तुझ्यासारखं होण्याची स्वप्न पाहिली असती. काश आम्ही राजकारणात गुंतून न पडता खऱ्या अर्थाने विज्ञान, ज्ञान याला महत्त्व दिलं असतं. काश 'वैज्ञानिक दृष्टिकोन' बाळगा सांगणारं संविधान आम्ही मनापासून जपलं असतं. हे सगळं घडेल आणि असा विचार करणं हा देखील एक पॅराडॉक्स आहेच आमचा. पण कधीतरी तो खरा व्हावा, येवढंच" 

आईन्स्टाईन 💗

13 April 2020

आयबीकार्ट (ibkart प्रत्येक गावात डिजिटल सुविधा)


 IBKart A Bussiness Portal
Click and Join Now

iBKart Login

नमस्कार,
प्रत्येक गावात डिजिटल सुविधा पोहोचाव्यात या उद्देशाने इंटेग्रा कंपनीने आयबी कार्ड हे एक बिजनेस पोर्टल लॉंच केले आहे.
*आयबी कार्ड* या मधील सुविधा :
* बँक खात्यात पैसे पाठवणे
(मनी ट्रान्सफर)
* इलेक्ट्रिक बिल भरणे
* मोबाईल रिचार्ज
* डीटीएच रिचार्ज
* FASTAG* सुविधा
* ट्रॅव्हल्स रिझर्वेशन
* रेल्वे रिझर्वेशन
* सर्व प्रकारचे इन्शुरन्स
अशाप्रकारे , प्रत्येक रास्त भाव दुकानदार, तसेच इच्छुक असलेला किराणा दुकानदार किंवा इतर इच्छुक व्यक्ती या सुविधेच्या एजंट लॉगिन करिता पात्र आहेत यापैकी कोणीही आयबी कार्ट शी जुळून आपला बिजनेस करू शकतो. या बिजनेस मधून मिळणारे कमिशन महिन्याचे दहा ते पंधरा हजार रुपया पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त मिळवून देणारे आहे. हे सर्वस्वी आपल्या ट्रांजेक्शन वर अवलंबून असते. यामध्ये आपल्याला साप्ताहिककॅशबॅक ऑफर सतत चालू असते आणि त्याची अपडेट आपल्या पोर्टल ला प्रतिदिन असते.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.

 iBKart Support

iBKart Support





rail image के लिए इमेज परिणाम

रल्वे इन्फॉरमेशन एजेंट फॉर्म 






Download PDF :
iBKart Commission Chart
Insurance Details


Serves



महाराष्ट्र शासनाचे वितरण धान्य व्यवस्थेबाबत माहिती व रास्त भाव दुकानदार यांना ई पॉस मशीन वापराबातची माहीती

महाराष्ट्र शासनाचेवितरणधान्य   व्यवस्थेबाबत व रास्त भाव दुकानदार यांना  पॉस मशीन वापराबातची माहीती



FPS Status / रास्त भाव दुकानदार यांची टक्केवारी तपशील 

रास्तभाव दुकानदार यांना दर महिण्याला प्राप्त झालेला स्टॉक व वाटप झालेला स्टॉक यामध्ये पाहू शकतात. तसेच एकुण राशन कार्ड संख्या व ऑनलाईन राशन कार्ड संखेची माहिती मिळते.


RC Details / राशन कार्ड धारकाच्या तपशील










Sales Transaction Details




लाभार्थी सत्यापण



लाभार्थी सत्यापण कसे करावे?


ई-पाॅस मशिनला मोबाईलचा हाॅस्टपाॅट कसा जोडावा?


ई-पाॅस मशिनवर धान्य कसे वितरण कसे करावे?




08 April 2020

कोरोना (Corona Virus) आजाराबद्दल काही उपयुक्त माहिती




🦠🦠...कोरोना आजाराबद्दल काही उपयुक्त माहिती...🦠🦠

About Corona Virus

 वाचा आणि इतरांना सांगा. 🙏🙏🙏🙏 _

*प्रश्न 1. Corona (कोरोना) शब्दाचा अर्थ काय आहे?*
उत्तर = Corona हा शब्द इंग्लिश नसुन लॅटिन भाषेतला आहे. याचा लॅटिन भाषेत अर्थ होतो crown (मुकुट). कारण या विषाणूला मुकुटासारखे टोकदार आवरण असते. 🤴

*प्रश्न 2. Corona हे आजाराचे नाव आहे की विषाणूचे?*

उत्तर = Corona हे विषाणूचे नाव आहे.याचे वैज्ञानिक नाव आहे Severe Acute Respiratory Syndrome novel Corona Virus-2 (SARS nCoV-2).  novel म्हणजे नवीन.
या विषाणूपासून होणार्‍या आजाराला Covid-19 (corona virus disease-2019) असे म्हणतात.

*प्रश्न 3. याचा उगम (origin) कुठे झाला?*

उत्तर = हा विषाणू सर्वप्रथम वुहान (Wuhan),चिन मध्ये पाहण्यात आला.हा विषाणू वटवाघूळामधून माणसांमधे आला व नंतर पसरत राहिला.हा विषाणू कोणत्या प्रयोगशाळेत तयार केला नाही तो निसर्गतःच तयार झाला आहे.

*प्रश्न 4. हा विषाणू कोणत्या-कोणत्या प्रदेशात पसरु शकतो ?*

उत्तर = ज्या ज्या प्रदेशात लोक रहातात अश्या सर्वच ठिकानी हा विषाणू पसरू शकतो. थंड असो अथवा उष्ण (भारतात सुद्धा).

*प्रश्न 5. भारतातील उन्हाळ्यात हा विषाणू जिवंत राहील का?*

उत्तर = या विषाणूला मारण्यासाठी 55° C पेक्षा जास्त तापमान लागते. भारतातील आत्तापर्यंतचे कमाल तापमान 51°C (फालोडी,राजस्थान-2016) आहे.म्हणून अफवांवर विश्वास ठेऊ नका. उलट हवेची आर्द्रता(Humidity) कमी झाल्यामुळे हा वेगाने संक्रमित होवू शकतो.

*प्रश्न 6. हा आजार कोणत्या व्यक्तींना होवू शकतो?*

उत्तर = सर्वच. पण विशेषतः लहान मुलांना (10 वर्षाच्या आतील) व वयस्क व्यक्तींना (60 वर्षाच्या वरील) होण्याची शक्यता जास्त आहे. आणि जे व्यक्ति अगोदरच आजारी आहेत अश्यांनी विशेष काळजी घ्यावी. तुम्ही तरुण व ताकदवान असलात तरीही याची बाधा तुम्हाला होऊ शकते आणि तुम्ही तो घरात पसरवू शकता.

*प्रश्न 7. दारु पिणाऱ्या लोकांना हा आजार होत नाही का?*

उत्तर = दारूने (Ethyl alcohol/Isopropyl alcohol) हा विषाणू मरतो पण जर ती 70% असेल तर. पण पिण्याची दारू ही 8 ते 40 % असते, त्यामुळे ही अफवा देखील चुकीची आहे.उलट दारू पिनाऱ्यांची रोगपरतिकारकशक्ती कमी होते आणि ते सहज आजारी पडू शकतात.

*प्रश्न 8. मांसाहार करणार्‍या व्यक्तींना हा आजार होतो का?*

उत्तर = जर जेवण करण्यापुर्वी हात साबणाने स्वच्छ धुतले आणि मांस अथवा अंडी स्वच्छ धुऊन व्यवस्थित उकडून घेतले तर हा विषाणू मरतो. (पण किमान 15 दिवस मांसाहार टाळलेला बरा)

*प्रश्न 9. या आजाराची लक्षणे काय आहेत?*

उत्तर = 1. ताप 
           2. सर्दी 
           3. श्वास घेताना अडचण होणे
           4. थकवा
           5. कोरडा खोकला

*प्रश्न 10. लक्षण दिसण्यास किती दिवस लागतात?*

उत्तर = 2 ते 16 दिवस. पण काही जणांमधे तर लक्षणच दिसत नाहित(Asymptomatic Patients). त्यामुळेच तर हा आजार इतका विचित्र आहे, कोणाला झाला आहे हे सांगणे फारच कठीण आहे. त्या व्यक्तीची चाचणी केल्याशिवाय काहीच सांगता येत नाही. अगदी आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीला देखील याची लागण झालेली असू शकते.लक्षण दिसण्या अगोदरच तो व्यक्ती व्हायरस पसरवतो(Carrier). म्हणुन तर वैज्ञानिक सांगत आहेत की एकमेकांपासून दुर रहा.

*प्रश्न 11. माझ्यात जर लक्षणे जाणवली तर ?*

उत्तर = काळजी करू नका. अगोदर डॉक्टर ला कळवा आणि त्यांचा सल्ला घ्या,तुमच्या प्रकृतीनुसार ते टेस्ट करायची की नाही हे ठरवतील.

*प्रश्न 12.  हा आजार कसा पसरतो?*

उत्तर = जो व्यक्ती आजारी आहे अश्या व्यक्ती जवळ गेल्यास, त्याने बोलल्यास, खोकल्यास,शिंकल्यास त्यातून बाहेर पडणार्‍या द्रवबिंदू (droplet) मधून पसरतो. नवीन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की कोरोणा ग्रस्त व्यक्ती त्याच्या बोलण्यातून देखील (aerosol) हा विषाणू पसरवू शकतो.

*प्रश्न 13. कारोणा बाधित व्यक्ती किती लोकांना बाधित करू शकतो?*

उत्तर = या आजाराचा प्रजनन क्रमांक (Reproduction Number R0)  हा 2.7 आहे म्हणजे एक बाधित व्यक्ती इतर 2 ते 3 जणांना बाधित करू शकतो.

*प्रश्न. 14. कोरोना झाल्यास व्यक्ती मरतो का?*

उत्तर = जर चिंता नाही केली आणि वेळेवर औषध घेतले तर हा आजार 100 % बरा होतो. असे खूप उदाहरण आहेत ज्यात खूप लोक बरे(recover) होताना दिसत आहेत.

*प्रश्न 15. हा विषाणू किती वेळ जिवंत राहतो?*

उत्तर = या विषाणूचा जीवनकाळ खालील प्रमाणे आहे
            1. हवा = 3 तास
            2. तांबे = 4 तास
            3. कागद (नोटा,वह्या,पुस्तक) = 1 दिवस
            4. स्टील = 2 ते 3 दिवस
            5. प्लास्टिक(मोबाईल,कॉम्प्युटर,पेन,कीबोर्ड)=3ते4 दिवस

*प्रश्न 16. या आजारावर कोणते औषध किंवा लस नाही का?*

उत्तर. सध्यातरी कोणतीच लस(Vaccine) उपलब्ध नाही.लस तयार होण्यास व उपलब्ध होण्यास किमान एक ते दीड वर्ष लागू शकतात. हा विषाणू स्वतःचा आकार बदलू शकतो(Mutation) म्हणून लस शोधणे अवघड आणि किचकट काम आहे. आणि आत्तापर्यंत तरी कोणतेच औषध यावर नाही.

*प्रश्न 17. गोमूत्र,लसूण,काळी मिरची,लवंग काम करते का ?*

उत्तर.  वरील वस्तू या आरोग्यासाठी हितकर असतात.पण यापैकी कोणतीच वस्तू कोरोना विषाणूला मारत नाही. यावर कोणतेच संशोधन झाले नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका.

*प्रश्न 18.Social Distancing म्हणजे काय?याचा काय उपयोग ?*

उत्तर = Social distancing (सामाजिक अंतरता) म्हणजे एकमेकांपासून किमान 5 ते 6 फूट अंतरावर राहणे जेणेकरून आपण आजारी व्यक्तींच्या संपर्कात येणार नाहीत आणि आपण जर आजारी असलात तर इतरांना संक्रमित करणार नाहीत.
          जर असे आपण किमान 2 ते 3 हफ्ते केलात(जे इटलीने किंवा चीनने केले नाही) तर आपण रुग्णांची संख्या कमी करू शकतो(Flattening the curve) व आपल्या दवाखान्यातील क्षमता अगोदरच कमी आहे त्यामुळे वैद्यकीय व्यवस्था देखील सुरळीत राहील.

*प्रश्न 19. मी कसे सुरक्षित राहू ? प्रतिबंध काय ?*

उत्तर. = तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी खालील प्रतिबंध करू शकता
         
  1.वारंवार हात धुणे.(किमान 30 सेकंद) दर 2 ते 3 तास.
      बाहेरून आल्यास सर्वात अगोदर हात-पाय धुवा.
  2.तोंडाला,नाकाला,डोळ्याला न धुतलेले हात न लावणे
  3.गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
  4. अनोळखी व्यक्तिंपासून सुरक्षित अंतर बाळगा.
  5. खोकलनाऱ्या,शिकणाऱ्या व्यक्तींपासून दुर रहा.
  6. वारंवार वापरातल्या वस्तूंना स्वच्छ पुसून घ्या.

*प्रश्न 20. हात कश्याने व कसे धुवावेत ?*

उत्तर = हात साबणाने किंवा हॅण्डवॉशने स्वच्छ धुवावेत. किमान 30 सेकंद तरी हात धुवावेत (100 % रोगाणू मरतात).हात धुण्याची वैज्ञानिक पद्धत खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

*प्रश्न 21. फेस मास्क वापरावेत का ?*

उत्तर = योग्य पद्धतीने वापरले तर काहीच हरकत नाही. पण नाक किंवा तोंड कुठून उघडे आहे का ? याची काळजी घ्यावी. रुमाल देखील चालतो पण तो रोज किमान दोनदा धुवा.

*प्रश्न 22. प्रवास करावा की नाही ?*

उत्तर = नाही अजिबात  नाही............कितीही अडचण असेल (दवाखाना व्यतिरिक्त) तरी प्रवास टाळा. आपण स्वतः तर बळी पडताल आणि सोबत इतरांना देखील घेऊन जाताल.

*प्रश्न 23. जनता कर्फ्यु ने खरंच कोरोना व्हायरस मरेल का ?*

उत्तर = काही प्रमाणात. पण जेंव्हा लोकं एकत्र येतील तेंव्हा हा पुन्हा वाढेल म्हणून आपले सर्वच कामे (जिवापेक्षा कमीच महत्वाची) टाळावी.उगाच मला काही होणार नाही म्हणून बाहेर पडून इतरांचा जीव धोक्यात घालू नका. कृपा करून सरकारला त्यांचे काम करुद्या.

*प्रश्न 24. खरा कर्फ्यु लागण्याच्या अगोदर सर्व आवश्यक वस्तू जमा कराव्यात का ?*

उत्तर = नाही. कितीही झाले तरी आवश्यक दुकानं बंद होणार नाहीत(उदा. किराणा,मेडिकल,दवाखाना).म्हणून उगीच घाई करू नका आणि वस्तूंची जमवा जमवी करू नये.

🙏🙏 *लक्षात ठेवा : प्रतिबंध हाच उपाय* 🙏🙏

04 April 2019

देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना


•देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

•देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

•देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

•देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

•देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू

•देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर

•देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश

•देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)

•देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

•देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

•देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान

•देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

•देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

•देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

•देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

•देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

•देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

•देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले -  दिल्ली

•देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)

•देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

•देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर

•देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

•देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

•देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

•देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

•देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

•देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

•देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

•देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

•देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

•देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

•देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे

•देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश

•देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

•देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

•देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

•देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

•देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

•देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

•देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

•देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

•देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

•देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश

•देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

•देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे

•देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

•देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

•देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - गरिफेमा