संकल्प
अनेक लोक असता वेळ विसरून जातात जबाबदारी
मात्र हीच वेळ निघता हातून फिरावे लागते दारोदारी
जीवनात येणारे प्रसंग हे जणू तलवारीचा वार करतात
या वारांवर मात करण्यास प्रयत्न आपल्याला शिकवतात
प्रयत्नान्ती यश म्हणून टाकलं ज्यानं त्यानं
करण्याचा पत्ताच नाही हाच मिळाला बहुमान
प्रयत्नाचा हा प्रवास अगणित आहे
करावा पक्का ध्यास यातच यश आहे
स्पर्धेच्या या प्रवाहात वाहून जावं लागत
आठवून आपली जबाबदारी त्यातच पोहावं लागत
....अविनाश गावंडे
No comments:
Post a Comment