recent posts

Comments system

[blogger][disqus][facebook]

26 January 2019

*अडाणी आईवडील*

मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९०% गुण मिळाले. वडील खुषीने Marksheet न्याहाळत आपल्या पत्नीला ... अग... छान लापशी बनव, तुझ्या लाडक्याला ९०% मार्क्स मिळालेत... शालांत परिक्षेत..!

 आई किचनमधुन पळत पळत येत म्हणाली, ".. बघुया मला दाखवा...!

 इतक्यात,.. मुलगा पटकन बोलला ...
 "बाबा तिला कुठे Result दाखवताय ?... तिला काय लिहता वाचता येते का.? अशिक्षित आहे ती...!"

भरल्या डोळ्याने पदर पुसत आई लापशी बनवायला निघुन गेली.

ही गोष्ट वडिलांना लगेच लक्षात आली...! मग ते मुलाच्या संवादात भर टाकुन म्हणाले... "हो रे ! ते पण खरच आहे...!

आमच लग्न झाल तेव्हा तीन महिन्यातच तुझी आई गर्भवती राहिली.. मी विचार केला लग्नानंतर कुठे फिरलो नाही.. व्यवस्थितपणे एकमेकांना समजल पण नाही,. तर ह्यावेळी गर्भपात करुन पुढे chance घेउया.. पण तुझी आई ठामपणे *"नाही"* म्हणाली.. नको ते नंतर वगैरे... फिरण, समजण पण नको... आणि तुझा जन्म झाला... *अशिक्षित होती ना...*

तु पोटात असताना तिला दुध बिल्कुल आवडत नसताना तु सुधृड व्हावास म्हणून नऊ महीने ती रोज दुध पित होती...
*अशिक्षित होती ना...*

तुला सकाळी सात वाजता शाळेत जाव लागायच म्हणजे स्वतः सकाळी पाच वाजता उठुन तुझ्या आवडीचा नाष्ता आणि डबा बनवायची.....
*अशिक्षित होती ना...*

तु रात्री अभ्यास करता करता झोपून जायचा तेव्हा येउन ती तुझी वह्या पुस्तक बरोबर भरुन तुझ्या अंगावर पांघरुन नंतरच झोपायची...
*अशिक्षित होती ना...*

तू लहानपणी बहुतेकवेळा आजारी असायचास... तेव्हा रात्र-रात्र  जागुन ती परत सकाळी तिची काम चोख करायची....
*अशिक्षित होती ना...*

तुला Branded कपडे घेउन द्या म्हणून माझ्या मागे लागायची आणि स्वतः मात्र एकाच साडीवर वर्षे चालवायची.
*अशिक्षित होती ना....*

बाळा.... चांगली शिकलेली लोक पहिला स्वतःला स्वार्थ आणि मतलब बघतात.. पण तुझ्य आईने आजवर कधीच तो बघितला नाही.
*अशिक्षित आहे ना ती...*

ती जेवण बनवुन आपल्याला वाढता वाढता कधी कधी स्वतः जेवायच विसरुन जायची... म्हणून  मी अभिमानाने सांगतो की *'तुझी आई अशिक्षित आहे...'*

हे सगळ ऐकुन मुलगा रङत रडत आईला बिलगुन बोलतो.. "आई मी तर फक्त पेपरवर ९०% मार्क मिळवलेत. पण माझ्या आयुष्याला १००% बनवणारी तु पहिली शिक्षक आहेस. आणि ज्या शिक्षकांची मुल ९०% मार्क मिळवतात.. त्या शिक्षकांकडे किती ज्ञान असेल ह्याचा मी कधी विचार केलाच नाही.
आई आज मला ९०% मार्क्स मिळवुन पण मी अशिक्षित आहे आणि तुझ्याकडे PHD च्या पण वरची Degree  आहे. कारण मी आज माझ्या आईच्या रुपात डॉक्टर, शिक्षक, वकिल, माझे कपडे शिवणारी Dress Designer, Best Cook ह्या सगळ्यांच दर्शन घेतल......!

*बोध:*.... प्रत्येक मुला- मुलीनी *जे आईवडिलांचा अपमान करतात, पाणउतारा करतात, शुल्लक कारणावरुन रागवतात.* त्यांनी विचार करावा.
त्यांच्यासाठी काय काय सोसलय आईवडिलांनी..🙏
*आई साठी नक्कीच शेअर करा.*👌🌹

3 comments:

  1. Here are some information about AT&T Email you can choose customer service for help and Assistant troubleshooting password and recover account.Contact Us. AT&T CUSTOMERS: If you need to reach AT&T Customer Care Service Number for AT&T Email Common Issues solutionsand Setup and Configure AT&T Email Account with Outlook mail.and more troubleshoot and resolve, view and pay your bill, Wi-Fi network support.

    ReplyDelete
  2. If you're using Apple products, here's how to set up Verizon email on your iPhone. Set up iPhone Verizon. 1 Choose settings. 2 Scroll down and choose Mail, Contacts and Calendars.
    Incoming Server and Port Numbers to Connect with windows Mail Live.Verizon eamil Setting on windows mail Configure POP and IMAP settings for Verizon.net.
    Verizon email shift in their customers would access email service to another mail service AOL mail service.Access Verizon.net email through the AOL mail account or with aol aap.Access Verizon aol email directly with other email service like Yahoo mail,IMPA Server AOL,POP3 mail Server.If Need Help to access your Verizon email login connect with Verizon customer service phone number to get assistant support and guide to solve your problems.

    ReplyDelete
  3. Real Mail Info the organization has come up with the best possible solutions through the client services. Real Mail Info is the third party service provider.

    Connect with Real mail Info to get instant help and solution for all the emails problems
    Email support is one of the primary aspects of client care for most organizations today. Most clients (63%) say that email support is a favored method to speak with brands. Normally, clients connect with brands utilizing email on the off chance that they can discover an email address on the brand’s site or through its application, or then again if the client has effectively gotten an email from the brand that they can just answer to.

    Like these mails aol mail , verizon mail , forntier mails, sbc global mails , Ymails , ATT Emails , included with services.

    ReplyDelete